onli.jpg 
विदर्भ

शिवभोजन सोडा हे आहे 'मातोश्री' भोजन; केवळ एक रुपयात

श्रीधर ढगे

खामगाव : महाविकास आघाडी सरकारने राज्यात नुकताच दहा रुपयात शिवभोजन हा उपक्रम सुरू केला. त्याची चांगलीच चर्चा सुरू आहे. दरम्यान, असाच उपक्रम गेल्या सात वर्षापासून बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात सुरू आहे. काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या संकल्पनेतून इथे स्व. मातोश्री सुलोचनादेवी सानंदा शिदोरी गृहात फक्त एक रुपयात शेतकऱ्यांना पोटभर जेवण मिळते.
 

हे वाचा - ‘पीडीकेव्ही’ चे संशोधन केंद्र देशात अव्वल
गेल्या सात वर्षापासून घेत आहेत आस्वाद

माजी मुख्यमंत्री  तथा केंद्रीयमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या प्रथम स्मृतीदिनी (ता.14 ऑगस्ट 2013) रोजी खामगाव मतदार संघाचे तत्कालीन आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या संकल्पनेतून खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने स्व. मातोश्री सुलोचनादेवी सानंदा शिदोरी गृह सुरू करण्यात आले. या शिदोरी गृहातमध्ये बळीराजाला नाममात्र एक रुपयात शुध्द सात्वीक जेवण देण्यात येत आहे. गेल्या सात वर्षांपासून शेतकरी बांधव एक रुपयात भोजनाचा लाभ घेत आहेत. साफसफाईसह शिदोरी गृहात चांगल्या प्रकारचे जेवण देत असल्याचे शेतकरी सांगतात आणि बाजार समितीच्या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त करतात.

 
क्लिक करा - जालन्याची चोरीची कार नंबर प्लेट बदलून विकत होता; मात्र फसला डाव
गुरुवारी पातोडी व गोड पदार्थ

शिदोरी गृहात दररोज जेवणामध्ये पोळी, भाजी, भात, वरण या पदार्थांचा समावेश असतो. गुरुवारी बाजाराचा दिवस असल्याने जास्त शेतकरी येतात. त्यांच्यासाठी दर गुरुवारी पातोडी किंवा अन्य झणझणीत वऱ्हाडी भाजी आणि एक गोड पदार्थ देण्यात येतो.

विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात
खामगाव बाजार समितीमध्ये विविध प्रकारचे विधायक उपक्रम राबविण्यात येतात. शेतकऱ्यांना फक्त एक रुपयात शुद्ध आणि सात्वीक भोजनाची सोय स्व. मातोश्री सुलोचनादेवी सानंदा शिदोरी गृहात करण्यात आली आहे.
-दिलीपकुमार सानंदा, माजी आमदार, खामगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

Duleep Trophy Final : तिलक वर्मा एकटा लढला, शतकाला एका धावेने हुकला; इशानच्या संघाकडे ३७२ धावांची आघाडी Video

रिल्सचा नाद, इंटरनेट सारखं बंद पडल्यानं व्हिडीओ अडकायचे; ५२ वर्षीय महिलेनं उचललं टोकाचं पाऊल

बापरे! कांदा-लसूण सुद्धा खात नाही अक्षय कुमार; दर सोमवारी असतो उपवास, नक्की कारण काय?

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT